Maharashtra Weather Updates : पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?

Maharashtra Weather Updates : पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?

| Updated on: May 27, 2025 | 11:16 AM

Mansoon Red Alert Warning : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यात मान्सूनच धडाकेबाज आगमन झालेलं आहे. रविवारी रात्रीपासूनच राज्यात अनेक भागांना मान्सूनच्या पहिल्या पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. तर मुंबईत देखील या पावसामुळे सखल भागात पाणी साचलेलं बघायला मिळालं. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यानंतर आज देखील हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 3 दिवसांसाठी राज्यातल्या काही भागांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

राज्यातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर आणि साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर पुणे घाट, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईला सुद्धा हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच हवामान विभागाकडून हायटाइडचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे.

Published on: May 27, 2025 11:10 AM