केरळमध्ये यंदा मान्सून ४ जूनला दाखल होणार तर विदर्भात कधी होणार आगमान?

| Updated on: May 24, 2023 | 4:13 PM

VIDEO | १५ जूनपर्यंत अजून उन्हाचे चटके सोसावे लागणार तर मान्सून कधी येणार? नागपूर हवामान विभाग म्हणतंय...

Follow us on

नागपूर : विदर्भात शेतकरी आवर्जून मान्सूनची वाट पाहत असतात. शेतकरी त्यानुसार आपली पीक पेरणी करत असतात. विदर्भात मॅान्सूनचं आगमन १५ जूननंतर होणार आहे, नागपूर हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. केरळमध्ये यंदा मॅान्सून चार दिवस उशीरा येणार आहे. ४ जूनला केरळमध्ये मॅान्सुनचं आगमन होईल. ११ जूनपर्यंत मुंबईत आणि १५ जूननंतर विदर्भात मॅान्सूनचं आगमन होईल, असा अंदाज नागपूर हवामान विभागाचे शास्रज्ञ गौतम नगराळे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे विदर्भातील जनतेला १५ जूनपर्यंत उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे. यंदा राज्यात कसा पाऊस होईल असा प्रश्न विचारला असता नागपूर हवामान विभागाचे शास्रज्ञ गौतम नगराळे म्हणाले की, हवामान खात्यानं केलेल्या पूर्वानुमानानुसार  पाऊस सरासरीपेक्षा पाच टक्के कमी होईल.