‘पहलगाम’नंतर भारत-पाकिस्तानात युद्धाचे ढग, पाक लष्करानंतर नागरिकांमध्येही घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्वाधिक सर्च
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊलं उचलली आहे. अशातच भारताच्या आक्रमक भूमिकेचा पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला आहे. गेल्या २४ तासात पाकिस्ताने सीमेवर जवानांची संख्या वाढवली आहे.
पाकिस्तानी लष्करानंतर आता पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या नागरिकांना देखील युद्धाची भिती वाटतेय. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्या तणाव हा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसतेय. पाकिस्तानच्या सोशल मीडियावर भारत आणि युद्धाशी संबंधित बातम्या ट्रेंड होत असल्याचे पाहायला मिळतंय. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यावर आपला विश्वास व्यक्त करत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्यासाठी वेळ आणि टार्गेट ठरवा असं म्हणत सैन्याला ग्रीन सिग्नल दिलाय. मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडली होती. या बैठकीनंतर आणि मोदींनी सैन्याला निर्णय घेण्यास सांगितल्यानंतर पाकिस्तानची झोपच उडाली आहे. या युद्धाच्या भितीनं पाकिस्तानी नागरिक गुगलवर भारताकडे सैन्य शक्ती किती? युद्ध कोण जिंकणार? अशा प्रश्नाची विचारणा गुगलवर करताय. बघा व्हिडीओ…
