Shirdi Protest | कोरोना काळात साई मंदिरात फुल, हारांवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यासाठी आंदोलन

| Updated on: Aug 17, 2022 | 6:45 PM

या लक्षवेधी आंदोलनात शेतकरी आणि व्यवसायीकही सहभागी झाले होते.अनेक वर्षांपासून सुरू असलेली फुले हार प्रसाद वाहण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे.

Follow us on

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज हजारो साईभक्‍त येत असतात.. दर्शनाला जाताना भक्त फुल – हार प्रसाद घेऊन जातात आणि श्रद्धेने साई समाधीवर चढवत असतात.. मात्र कोरोना काळात हार फुले वाहण्यास बंदी घातली गेल्याने आजही भक्तांना फुल हार वाहता येत नाहीए.. शिर्डी परिसरातील हजारो शेतकरी फुल शेती करतात तर अनेक व्यावसायिकांची उपजिवीका त्यावर अवलंबून आहे.आता कोरोना संपलाय, हजारो भाविक दर्शनाला येत असूनही हार फुलावर घातलेली बंदी उठवली गेली नाही त्यामुळे शेतकरी आणि व्यवसायीक आर्थिक संकटात सापडले आहेत.सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आज कोपरगाव ते शिर्डी पायी प्रवास करत शिर्डीतील द्वारकामाई मंदिरासमोर फुले वाहिली..या लक्षवेधी आंदोलनात शेतकरी आणि व्यवसायीकही सहभागी झाले होते.अनेक वर्षांपासून सुरू असलेली फुले हार प्रसाद वाहण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे.