XXXX, XXXX बाईबद्दल मला बोलायचं नाही, कंगनाप्रकरणी बोलताना खासदार Krupal Tumane यांची जीभ घसरली

XXXX, XXXX बाईबद्दल मला बोलायचं नाही, कंगनाप्रकरणी बोलताना खासदार Krupal Tumane यांची जीभ घसरली

| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 3:14 PM

चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून विवादित बयाण देत आहे. कंगना राणावतला मीडियानं फारस महत्त्व देऊ नये, ती हलकट बाई आहे, अशा शब्दांत रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी तिचा खरपूस समाचार घेतला.

चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून विवादित बयाण देत आहे. कंगना राणावतला मीडियानं फारस महत्त्व देऊ नये, ती हलकट बाई आहे, अशा शब्दांत रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी तिचा खरपूस समाचार घेतला. तिनं सत्ताधारी नेत्याच्या मागे लागून त्यांचे पाय चाटून पुरस्कार मिळविला असल्याचं कृपाल तुमाने म्हणाले.

कंगना राणावतनं या आधी महात्मा गांधींबद्दल सुद्धा वक्तव्य केलं. इंस्टाग्राम पोस्टवर तिनं महात्मा गांधी यांना सत्तेची भूक होती, असं म्हटलं. तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये शहीद भगतसिंग यांना फाशी व्हावी, असं महात्मा गांधी यांना वाटत होते, अशी रीही ओढली. त्यावरून कंगना राणावतवर चौफेर टीका होत आहे. महात्मा गांधींबद्दल बोलण्याची तिची औकात नाही. अशा हलकट बाईबद्दल मला बोलायचं नाही, असंही शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने म्हणाले.