गद्दारी अन् निवडणूक; गुढीपाडव्याच्या दिवशी ठाकरेगटाच्या खासदाराचा शिवसेनेवर घणाघात

| Updated on: Mar 22, 2023 | 11:11 AM

ठाण्यातील या शोभा यात्रेला मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक हे सहभागी झालेले आहेत. या शोभा यात्रेमधून एकूण 75 चित्ररथ साकारण्यात आलेले आहेत. या शोभयात्रेतून आपली संस्कृती दिसून येते. आम्ही देखील यासोबत यात्रेचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. या ठिकाणी पुष्पवृष्टी करून आम्ही यासोबत करतोय, असं राजन विचारे म्हणाले आहेत.

Follow us on

ठाणे : आज गुढीपाडव्याचा सण आहे. त्यानिमित्त ठाण्यातील शोभा यात्रेत ठाकरेगटाचे नेते, खासदार राजन विचारे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाने सर्व जनता त्रस्त झालेली आहे. यांनी गद्दारी केली आहे. जनता यावर नाराज आहे. त्यामुळे जनता येत्या काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं राजन विचारे म्हणाले आहेत. येत्या नवीन वर्षात या ठिकाणी महाविकास आघाडीच्यामार्फत लोकहिताची गुढी उभारलेली पहायला मिळेल, असंही ते म्हणालेत.