MSRTC : अरररर देवा… फक्त 3 नटबोल्टवर धावली लालपरी अन्… बघा व्हिडीओ
रायगडहून मुंबईकडे निघालेल्या एसटी बसची दयनीय अवस्था पाहून प्रवाशांना धडकीच भरली आहे. कारण ही बस रायगडहून मुंबईकडे यायला निघाली होती पण ही बस अवघ्या ३ नट बोल्टवर धावली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागल्याचे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
रायगडमधून मुंबईकडे धावणाऱ्या एसटी बसची अवस्था पाहून प्रवाशांच्या अंगावर अक्षरशः शहारे येतील. कोकणात एसटीच्या दयनीय अवस्थेचं जिवंत उदाहरण म्हणजे अवघ्या तीन नट बोल्टावर धावणारी ही एसटी बस… ही धोकादायक बस रायगडहून मुंबईकडे प्रवासासाठी वापरण्यात आली होती. यामुळे प्रवाशांचा जीव थेट टांगणीला लागला असल्याचे या बसमधील प्रवाशांनी सांगितले. दरम्यान, एसटीच्या या कारभारावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. कोकणातील एसटी बस सेवेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून देखभाल, तांत्रिक तपासणी आणि सुरक्षेकडे एसटी प्रशासन गंभीरपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जातोय. दुर्घटना घडून गेल्यावरच का नेहमी जाग येते? असा संतप्त सवालही प्रवाशांकडून या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.
Published on: Jun 28, 2025 05:56 PM
