MSRTC : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, ST कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आता कोणीही अडचण येणार नाही, कारण…

MSRTC : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, ST कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आता कोणीही अडचण येणार नाही, कारण…

| Updated on: Jun 28, 2025 | 3:55 PM

लालपरीच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सेवा निवृत्त कर्मचारी अर्थात पती-पत्नीला देण्यात येणाऱ्या पासची मुदत वाढवून आता हा पास वर्षभरासाठी मोफत देण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आता ओळखपत्र देण्यात येणार आहे. सेवा निवृत्तीनंतरच्या सवलती घेताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळामध्ये सध्या ४० हजार निवृत्त कर्मचारी आहेत. या सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एसटीच्या या निर्णयानंतर लाभ मिळणं सोपं होणार आहे.

इतकंच नाहीतर एसटी महामंडळातून निवृत्त झाल्यानंतर त्यांची ओळख पटावी म्हणून हे ओळखपत्र त्यांना दिलं जाणार आहे. यासह एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा मोफत प्रवास पास ९ ऐवजी १२ महिन्यांसाठी मिळणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीलाही वर्षभर हा मोफत पास मिळणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जूनपासून ४६ टक्क्यांऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक पर्याय निवडत एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on: Jun 28, 2025 03:55 PM