शिवसेना मतं मागायला गेली की मुंबईकर म्हणतील पुढं चला

शिवसेना मतं मागायला गेली की मुंबईकर म्हणतील पुढं चला

| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 9:32 PM

मुंबई महानगरपालिकेत आज आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्या कारच्या प्रवासामुळे राजकीय चर्चेना उधा आले असले तरी या सगळ्यात काँग्रेसची गोची होणार असल्याचे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले

मुंबईःमुंबई महानगरपालिका निवडणूकीत ज्यावेळी शिवसेना मतं मागायला जातील त्यावेळी लोकं म्हणतील पुढं चला. कारण तुम्ही जो काय मुंबईचा बट्याबोळ केला आहे आता आमच्याकडे मतं मागायला येऊ नका मुंबईतील खड्डे, भ्रष्टाचार यामुळे मुंबईकर या सरकारला कंटाळले आहे. त्यामुळे यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी मतं मागायला नेते जातील त्यावेळी मुंबईकर त्यांना पुढे चला एवढचं म्हणतील. मुंबई महानगरपालिकेत आज आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्या कारच्या प्रवासामुळे राजकीय चर्चेना उधा आले असले तरी या सगळ्यात काँग्रेसची गोची होणार असल्याचे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. आदित्य आणि अजित पवार यांच्या भेटीची चर्चा रंगात आली असली तरी या राज्यसरकारला जनता कंटाळली आहे.