Mankhurd Dahi Handi : आनंदाला गालबोट… दहीहंडीचा दोर बांधताना तोल गेला अन्… मुंबईत कुठं घडली दुर्दैवी घटना?

Mankhurd Dahi Handi : आनंदाला गालबोट… दहीहंडीचा दोर बांधताना तोल गेला अन्… मुंबईत कुठं घडली दुर्दैवी घटना?

| Updated on: Aug 16, 2025 | 5:13 PM

दहीहंडी उत्सवाच्या उत्साहात अनेकदा दुर्दैवी अपघात घडतात. सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्ष केल्याने हे अपघात घडतात. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या उपापययोजना हल्ली दहीहंडी उत्सवाचे आयोजक करताना दिसतात

राज्यभरात दही हंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, दादर या ठिकाणी गोविंदा पथकांची दही हंडी फोडण्यासाठी एकच चंगळ पाहायला मिळत असताना उत्साहाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात गोविंदांचा जल्लोष सुरू असताना मुंबईतून एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथे दहीहंडी उत्सवाची तयारी करत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. जगमोहन चौधरी (वय ३९) असे या मृत तरुणाचे नाव आहे. दहीहंडी बांधण्यासाठी दोर लावत असताना, जगमोहन चौधरी या गोविंदाचा तोल गेला आणि उंचावरून खाली पडल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला तात्काळ गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Published on: Aug 16, 2025 05:02 PM