Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; ‘या’ स्थानकांवर थांबणार नाही लोकल

| Updated on: Jan 18, 2026 | 11:56 AM

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आज, रविवारी, अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान धिम्या मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत ब्लॉक राहील. मस्जिद, सँडल्स रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. हार्बर मार्गावरही पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 पर्यंत ब्लॉक असल्याने मुंबईकरांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागेल.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आज, रविवारी, अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवांवर परिणाम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 वाजेपर्यंत हा ब्लॉक कार्यान्वित राहील.

या ब्लॉकमुळे मस्जिद, सँडल्स रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार या स्थानकांवरील लोकल थांबे रद्द करण्यात आले आहेत. या स्थानकांवर जलद मार्गासाठी फलाट नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान पोर्ट लाईन वगळून अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. डाऊन धीम्या मार्गावरील काही लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला या स्थानकांवर थांबतील. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Jan 18, 2026 11:56 AM