Navi Mumbai International Airport :  कसं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? मोदींच्या हस्ते आज एअरपोर्ट, मेट्रो ३ चे उद्घाटन

Navi Mumbai International Airport : कसं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? मोदींच्या हस्ते आज एअरपोर्ट, मेट्रो ३ चे उद्घाटन

| Updated on: Oct 08, 2025 | 11:14 AM

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई मेट्रो ३ चा शुभारंभ होत आहे. यामुळे मुंबईसह ठाणे, नाशिक आणि पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो ३ चा अंतिम टप्पा सुरू होणार असून, नवी मुंबई विमानतळ वर्षाला ९ कोटी प्रवाशांची क्षमता बाळगणार आहे.

पंतप्रधान मोदींनी आज मुंबई दौऱ्यादरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई मेट्रो तीनचे उद्घाटन केले. त्यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा आणि मेट्रो तीनचा तिसरा व अंतिम टप्पा सुरू झाला. यामुळे मुंबईकरांसह ठाणे, नाशिक आणि पुणे येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई मेट्रो तीन प्रकल्पात एकूण २७ स्थानके असून, त्यापैकी २६ स्थानके भूमिगत आहेत, तर केवळ आरे कॉलनी येथील एक स्थानक जमिनीवर आहे. आता या मेट्रोमार्गावरून प्रवाशांना वरळीतील विज्ञान संग्रहालय, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधानभवन आणि कफ परेड अशा महत्त्वाच्या ठिकाणी प्रवास करता येणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. यात भव्य परिसर, आधुनिक एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल्स, ३७०० मीटर लांबीची धावपट्टी, २९ कॉन्टॅक्ट एअरक्राफ्ट स्टँड्स, १३ रिमोट कमर्शिअल आणि सात कार्गो स्टँड्सचा समावेश आहे. एकाच वेळी दीड हजार कार, २० बस आणि २० ट्रकसाठी पार्किंगची सोय उपलब्ध आहे. या विमानतळाची वार्षिक क्षमता नऊ कोटी प्रवाशांची असून ते मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवाई वाहतुकीला मोठा हातभार लावणार आहे.

Published on: Oct 08, 2025 10:30 AM