Nalasopara Crime News : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! पोटच्या तीन मुलींवर नराधम बापाकडून अत्याचार

Nalasopara Crime News : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! पोटच्या तीन मुलींवर नराधम बापाकडून अत्याचार

| Edited By: | Updated on: Feb 27, 2025 | 4:18 PM

Father Abused Three Dauthers : नालासोपारा येथे एका नराधम बापाने आपल्या पोटच्या तीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नालासोपारा पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं आहे.

मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नालासोपारा मधून समोर आली आहे. पोटच्या तीन मुलींवर विकृत वासनांध बापाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

नालासोपारा येथे पोटच्या तीन मुलींवर 56 वर्षीय बापाने लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेतील पीडित तीन मुलींपैकी मोठी मुलगी 21 वर्षांची आहे. तर दोन मुली अल्पवयीन आहेत. विशेष म्हणजे यातील एका मुळीच चारवेळा गर्भपात देखील करण्यात आलेला आहे. आरोपी बाप हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर दरोडा, चोरीचे गुन्हे देखील दाखल आहे. मुली आणि पत्नीला दहशतीत ठेऊन तो हे कृत्य करत होता. काल पीडित मुलींची आई आणि तिन्ही मुलींनी हिम्मत करून नालासोपारा पोलीस ठाण्यात वडिलांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी बापावर बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Published on: Feb 27, 2025 04:14 PM