Devendra Fadnavis | तुमच्या जावयाला हर्बल तंबाखूची परवानगी आहे का ? फडणवीसांचा मलिकांना टोला

| Updated on: Oct 25, 2021 | 6:30 PM

'एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला. पण मंत्री म्हणतो की ही हर्बल तंबाखू आहे. मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले की आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील', अशी खोचक टीका फडणवीस यांनी नवाब मलिकांवर केलीय.

Follow us on

‘एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला. पण मंत्री म्हणतो की ही हर्बल तंबाखू आहे. मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले की आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील’, अशी खोचक टीका फडणवीस यांनी नवाब मलिकांवर केलीय.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. यावेळी फडणवीस यांनी एका प्रचारसभेत बोलताना महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. महाविकास आघाडीतील लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहेत. सामान्य माणसाटी अवस्था वाईच आहे. अतिवृष्टीत मोठं नुकसान झालं पण या सरकारने रुपयांची मदत केली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. पण यांचे पैसे सरकारला मिळत नाहीत. पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे इतके लबाड आहेत की काहीही झालं की केंद्रावर ढकलतात. बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं असं सांगतील, अशी खोचक टीका फडणवीसांनी केलीय.