Mumbai Fuel Price Hike | मुंबईमध्ये Petrol Diseal च्या दरामध्ये वाढ

| Updated on: Apr 05, 2022 | 12:02 PM

राष्ट्रीय बाजारात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती सातत्याने वाढत आहेत. 15 दिवसांत 12व्यांदा पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांनी वाढ झाली आहे. वाढलेले दर आज सकाळी सहा वाजल्यापासून लागू झाले आहेत.

Follow us on

राष्ट्रीय बाजारात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती सातत्याने वाढत आहेत. 15 दिवसांत 12व्यांदा पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांनी वाढ झाली आहे. वाढलेले दर आज सकाळी सहा वाजल्यापासून लागू झाले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलसाठी प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ जाहीर केली आहे. 15 दिवसांतील ही 13वी वाढ आहे. या वाढीमुळे आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.61 रुपये, तर डिझेलची किंमत 95.87 रुपये प्रति लीटर झाली आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 119.67 रुपये आणि 103.92 रुपये आहेत.