Mumbai Raja Visarjan 2025 : बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला… मुंबईतील बाप्पांना अखेरचा निरोप, बघा मिरवणूक
२०२५ च्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई आणि पुणे शहरांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहाने आणि भावभक्तीने पार पडल्या. लाखो भक्तांनी या उत्सवात सक्रिय सहभाग घेतला.
अनंत चतुर्दशी २०२५ निमित्त मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यभरात दहा दिवसाच्या बाप्पांना निरोप दिला जात आहे. मुंबई आणि पुण्यात गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडत आहे. मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले. मुंबईतील चिंचपोकळीचा प्रसिद्ध चिंतामणी, लालबागचा राजा, परळचा महाराजा, मुंबईचा राजा यासह सर्व सार्वजनिक मंडळाचे गणपती बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेत. गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ढोल-ताशा आणि गुलाबाच्या फुलांचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर पुण्यातही अनेक गणपतींचे विसर्जन पार पडले. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून विसर्जन सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Published on: Sep 06, 2025 05:42 PM
