मुसळधार पावसाने मुलुंड टोलनाका परिसरात वाहतूक मंदावली! काय आहे सद्यस्थिती?
मुंबईत मुसळधार पावसामुळे मुलुंड टोलनाका परिसरातील वाहतूक पूर्णतः मंदावली आहे. सकाळच्या वाहतुकीच्या वेळी रस्त्यांची दुरवस्था आणि अर्धवट रस्तेकाम यामुळे वाहनधारकांना मोठी अडचण येत आहे. ठाणे-मुंबई मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून, पोलिसांनी वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर देखील झाला आहे.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मुलुंड टोलनाका परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि सुरू असलेली रस्तेकामे यामुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. सकाळच्या काळात नोकरीला जाणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणात उशीर होत आहे. पोलिसांनी वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत तरीही वाहतूक कोंडी कायम आहे. दादर येथे मोनोरेल सेवाही प्रभावित झाली आहे. पावसामुळे मुंबईतील रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
Published on: Sep 15, 2025 09:07 AM
