Breaking | परमबीर सिंह यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी

Breaking | परमबीर सिंह यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी

| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 6:17 PM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेकत. कारण सिंह यांच्याविरोधात ठाणे न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. न्यायालयाने ठाणे पोलिसांना परमबीर सिंह यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेकत. कारण सिंह यांच्याविरोधात ठाणे न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. न्यायालयाने ठाणे पोलिसांना परमबीर सिंह यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे नगर पोलिस ठाण्यात सिंह यांच्याविरोधात दाखल असलेल्या खंडणी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने हा आदेश दिला आहे. केतन तन्ना आणि सोनू जलान यांनी सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

मुंबईतील अँटिलिया स्फोटकं प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यात 100 कोटी वसुलीचं टार्गेट पोलिसांना दिलं जात असल्याच्या गंभीर आरोपाचा समावेश होता. देशमुख यांच्यावर वसुलीबाबतचे आरोप झाल्यानंतर परमबीर सिंह यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाणे आणि मुंबईत सिंह यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

Published on: Oct 30, 2021 05:50 PM