Mumbai Railway Megablock : मुंबईकरांनो… उद्या ट्रेनने प्रवास करताय? वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा, कुठे कसा ब्लॉक?
उद्या रविवार असल्याने मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम मार्गावर उद्या दिवसा कोणताही ब्लॉक नसणार आहे. रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा.
मुंबईकरांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर उद्या रेल्वेने प्रवास करत असाल तर उद्या रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. कारण मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर उद्या वडाळा ते मानखुर्दपर्यंत उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासह मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अशा जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर उद्या रविवारी दिवसा कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. तर २०/२१ मे २०२५ च्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेच्या वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टीम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी मंगळवार/बुधवार मध्यरात्री म्हणजे २०/२१ मे २०२५ रोजी वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान सकाळी ००:३० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत अप आणि डाउन गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
