Special Report | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी

Special Report | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी

| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 9:32 PM

हे पत्र जुन्या घराच्या पत्त्यावर आलं आहे. त्याचा पत्ता चुकलेला होता पण ते आलेलं आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.  ते पत्र अंत्यत अश्लिल भाषेत आहे, स्त्रियांच्या प्रत्येक अंगाचा उल्लेख आहे. घरच्यांना, मुलांना मारुन टाकू, अशी भाषा वापरण्यात आली आहे.

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar Death Threat) यांना धमकीचं पत्र देण्यात आलं आहे. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही  9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रात काय लिहिलं याविषयी माहिती दिली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी इतर पत्र येतचं असतात, असं सांगितलं त्यामध्ये ते पत्र होतं. जी पत्र येतात ती सगळीचं पत्र उघडतो. हे पत्र जुन्या घराच्या पत्त्यावर आलं आहे. त्याचा पत्ता चुकलेला होता पण ते आलेलं आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.  ते पत्र अंत्यत अश्लिल भाषेत आहे, स्त्रियांच्या प्रत्येक अंगाचा उल्लेख आहे. घरच्यांना, मुलांना मारुन टाकू, अशी भाषा वापरण्यात आली आहे. पत्रामध्ये आत वेगळं नाव आहे. बाहेर वेगळं नाव आहे. पनवेल पोस्ट आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. मी यासंदर्भात पोलिसात तक्रार देणार आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, मी शिवसेनेची कार्यकर्ती असून धमकावून घरी बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेतलीच पाहिजे. आशिष शेलार यांच्यासंदर्भातील वाद वेगळा आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.