संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना
Latur Drugs Racket : मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने लातूरमध्ये ड्रग्सचा कारखाना उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने लातूरमध्ये ड्रग्सचा कारखाना उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा पोलीस कर्मचारी आरोपींना साहित्य पुरवून ड्रग्स बनवत होता. लातूरमधील या ड्रग्सच्या कारखान्यावर डीआरआयने छापेमारी केली आहे. या ठिकाणाहून 2 कोटी रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलेलं आहे. तसंच पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे.
लातूरमध्ये चक्क मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने ड्रग्सचा कारखाना उघडला आहे. सर्व साहित्य पुरवून आरोपींकडून हा पोलीस कर्मचारी ड्रग्स बनवून घ्यायचा. रोहिणा गावात पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू होता. यावेळी छापा मारण्यासाठी आलेल्या डीआरआयच्या अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्यासोबत आरोपीची झटापट देखील झाली. या झटापटीत कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचकीला जाऊन धडकली. या छाप्यात डीआरआयच्या पथकाने तब्बल 2 कोटी रुपयांचे ड्रग्स आणि 5 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, डीआरआयच्या कारवाईपर्यंत स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती.
