वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मुंबई पोलिसांनी दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मुंबई पोलिसांनी दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या

| Updated on: Jun 03, 2022 | 10:04 AM

अनेक दिवसांपासून पोलिस यांच्यावरती पाळत ठेऊन होते. तसेच पोलिसांकडे याच्याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.

ओला कारमध्ये फिरून महामार्गावर एकट्याने जाणाऱ्या कारला ओव्हरटेक करून कार थांबवून मौल्यवान मोबाईल, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू सोबत ठेवणाऱ्या अशा चार दरोडेखोरांना मुंबईच्या बोरिवली पूर्व कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. 25 मे रोजी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील मेट्रो मॉलजवळ दरोडेखोरांनी एका व्यक्तीची सोनसाखळी आणि आयफोन 13 प्रो हिसकावून पळ काढला होता. अनेक दिवसांपासून पोलिस यांच्यावरती पाळत ठेऊन होते. तसेच पोलिसांकडे याच्याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.

अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे,
1. भाविन महावीर स्वामी (ओला ड्रायव्हर),
२. सरफराज उर्फ प्रिन्स नईम शेख,
3. मनीष कुमार गोपाल तुरी,
4. अंकित पराग पटेल

Published on: Jun 03, 2022 09:53 AM