Maratha Reservation Rally : जरांगेंच्या आंदोलनाला पावसाचा फटका; आझाद मैदानात चिखल अन् मराठ्यांचे हाल, नेमकी परिस्थिती काय?

Maratha Reservation Rally : जरांगेंच्या आंदोलनाला पावसाचा फटका; आझाद मैदानात चिखल अन् मराठ्यांचे हाल, नेमकी परिस्थिती काय?

| Updated on: Aug 30, 2025 | 12:33 PM

3000 हून अधिक वाहनांसह हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत, ज्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे मुंबईत होत असल्याचा पावसाचा फटका या आंदोलनातील आंदोलकांना बसल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन जोरदार सुरू आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. तर पोलिसांनी सुरुवातीला आंदोलनाला केवळ एका दिवसाची परवानगी दिली होती, परंतु जरांगे पाटील यांनी आरक्षणाशिवाय मागे हटण्यास नकार दिल्याने, आंदोलनाला आणखी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आजही मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलक मुंबईत ठाण मांडून आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपासून मुंबईत पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्याने या मुसळधार पावसाचा फटका मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बसलाय. मनोज जरांगे पाटीला यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर बसलेल्या आंदोलकांची या पावसामुळे मोठी गैरसोय झाली आहे. पावसामुळे आझाद मैदानावर मोठं चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं असून पाण्याचे ठिकठिकाणी डबके देखील साचले आहेत. त्यामुळे आंदोलकांचे मोठे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बघा सध्या कशी आहे आंदोलनस्थळाची परिस्थिती?

Published on: Aug 30, 2025 12:16 PM