Mumbai Rain Update : आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार? हवामान खात्याचा अंदाज काय?

Mumbai Rain Update : आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार? हवामान खात्याचा अंदाज काय?

| Updated on: May 08, 2025 | 10:34 AM

दोन दिवसांपासून मुंबईत वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली, अंधेरी आणि आसपासचा परिसर तसेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई शहरांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला होता. आज कसं असणार मुंबईत वातावरण? हवामान खात्यानं काय म्हटलं?

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आणि मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. असे असले तरी मुंबईकरांची या अवकाळी पावसानं चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, आज देखील तसंच वातावरण मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील मुंबईकरांना अनुभवायला मिळणार असल्याचे हवामान खात्यानं सांगितले. काल दहिसर येथे सकाळी ८ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर मुंबई शहरात ४१ मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी आठ वाजल्यापासूनच मुंबई भागात रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाली तर संध्याकाळी चार वाजता मुंबईतील काही भागात जोरदार हजेरी पाहायला मिळाली.

दरम्यान आज देखील मुंबईतील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ठाणे, पालघर, वसई या भागातही मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर हवामान खात्याकडून पुढील चार ते पाच दिवसांसाठी हवामान अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पुढील काही दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला असून राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे.

Published on: May 08, 2025 10:34 AM