Wadala Stn Video : लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्…,  CCTV बघून तुम्हाला भरेल धडकी

Wadala Stn Video : लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्…, CCTV बघून तुम्हाला भरेल धडकी

| Updated on: Feb 07, 2025 | 4:41 PM

लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. या लोकल ट्रेनमधून लाखो नोकरदार प्रवास करत असतात. अशातच आज मुंबईतील वडाळा रेल्वे स्थानकात एक मोठा अपघात टळला आहे. लोकलमधून उतरताना एका प्रवासी महिलेची ओढणी दुसऱ्या प्रवाश्याच्या बॅगमध्ये अडकल्याने उतरणे जमले नाही आणि लोकल सुरू झाली. दरम्यान, एका महिला पोलीस हवालदाराच्या प्रसंगावधानामुळे गंभीर अपघात टळला आहे. वडाळा […]

लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. या लोकल ट्रेनमधून लाखो नोकरदार प्रवास करत असतात. अशातच आज मुंबईतील वडाळा रेल्वे स्थानकात एक मोठा अपघात टळला आहे. लोकलमधून उतरताना एका प्रवासी महिलेची ओढणी दुसऱ्या प्रवाश्याच्या बॅगमध्ये अडकल्याने उतरणे जमले नाही आणि लोकल सुरू झाली. दरम्यान, एका महिला पोलीस हवालदाराच्या प्रसंगावधानामुळे गंभीर अपघात टळला आहे. वडाळा रेल्वे स्थानकातल्या त्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओ समोर आला आहे. या महिला पोलीस हवालदाराच्या सतर्कतेचं आणि त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. रुपाली कदम असं या महिला पोलीस हवालदाराचे नाव आहे. लोकलमधून उतरताना एका प्रवासी महिलेची ओढणी दुसऱ्या प्रवाश्याच्या बॅगेत अडकल्याने मोठा अपघात होता होता राहिलाय. लोकल सुरू झाल्याने प्रवासी महिला पूनम लोखंडे यांना नीट उतरता आले नाही आणि पुन्हा चढताही आले नसल्याने त्या लोकलला लटकल्या होत्या. पोलीस हवालदार रुपाली कदम यांनी धावत जाऊन या महिलेची सुटका केली आणि त्यांचा जीव वाचवल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Feb 07, 2025 04:31 PM