चंद्रपुरात पूरस्थिती, पुरात अडकलेल्या नागरिकांचं महापालिकेकडून बचावकार्य सुरू

चंद्रपुरात पूरस्थिती, पुरात अडकलेल्या नागरिकांचं महापालिकेकडून बचावकार्य सुरू

| Edited By: | Updated on: Jul 14, 2022 | 1:45 PM

राज्यात पावसाचा जोर कायम असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. नागपूर शहरासह विदर्भातील काही जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात पावसाचा जोर कायम असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. नागपूर शहरासह विदर्भातील काही जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पावसाने ठाण मांडलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीवरील पुलावरून दोन फूट पाणी वाहत असून आर्वी ते राजुरा मार्ग बंद झाला आहे. इरई नदीला आलेल्या पुरामुळे बल्लारपूर तालुक्यातील मौजा मान ते हडस्ती मार्ग बंद आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांचं महापालिकेकडून बचावकार्य सुरू आहे.

Published on: Jul 14, 2022 01:45 PM