पुण्यात फडणवीस-राज ठाकरे आमने-सामने; भाजपच्या सभेच्या ठिकाणी मनसेचीही रॅली

पुण्यात फडणवीस-राज ठाकरे आमने-सामने; भाजपच्या सभेच्या ठिकाणी मनसेचीही रॅली

| Updated on: Jan 13, 2026 | 2:03 PM

पुण्याच्या गोखलेनगरमधून राज ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरवात झाली आहे. अर्थात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आमने सामने दिसणार आहेत.

महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने 29 महापालिका क्षेत्रांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या रॅली निघत आहेत. पार्श्वभूमीवर पुण्यात ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे, त्याच ठिकाणी मनसेच्या नेत्यांची रॅली आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. मात्र राज ठाकरेंच्या गाडीचा रस्ता पोलिसांकडून अडवण्यात आला असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलाय. पुण्याच्या गोखलेनगरमधून राज ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरवात झाली आहे. अर्थात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आमने सामने दिसणार आहेत. जनतेने निर्णय केलाय जनतेच्या मनात महायुती आहे. महायुती प्रचंड जागा घेऊन या ठिकाणी निवडून येणार आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे.

Published on: Jan 13, 2026 02:03 PM