मुरळीधर मोहोळ राजकारणातून संन्यास घेणार? थेट विरोधकांना आव्हान, नेमकं काय म्हणाले?
भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड मधील निलेश घायवाळ प्रकरणातील गुन्हेगारांना विदेशात पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाप्रकरणी मुरलीधर मोहोळ यांनी थेट आव्हान दिलं आहे.
राज्यात सगळीकडेच निवडणूक प्रचाराचे वारे वाहत आहेत. त्यामध्येच एक नवीन वाद समोर आलाय, भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड मधील निलेश घायवाळ प्रकरणातील गुन्हेगारांना विदेशात पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाप्रकरणी मुरलीधर मोहोळ यांनी थेट आव्हान दिलं आहे.
यासंदर्भात बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, माझ्यावर जे काही आरोप झालेत ते सिध्द करून दाखवा जर ते सिध्द झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईन. मात्र माझ्यावरचे आरोप सिध्द न झाल्यास त्यांनीच संन्यास घ्यावा असा थेट इशारा निलेश घायवाळ यांना दिला आहे. या प्रकरणी चर्चेसाठी मी एका व्यासपीठावर यायला तयार आहे, असं देखील मुरलीधर मोहोळ म्हणाले.
Published on: Jan 08, 2026 02:55 PM
