Mumbai Police आणि मुंबई महानगरपालिकेचा MVA सरकारकडून दुरुपयोग : Mohit Kamboj

Mumbai Police आणि मुंबई महानगरपालिकेचा MVA सरकारकडून दुरुपयोग : Mohit Kamboj

| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 6:40 PM

एक एक स्क्वेअर फुटाची जमीन खुशाल चेक करावी आम्हाला काही फरक पडणार नाही, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. महापालिकेचे अधिकारी पाहणी करतील. त्यानंतर त्यांचा अहवाल करतील. हा अहवाल झाल्यानंतर मला नोटीस पाठवतील. त्यावर मी त्यांना उत्तर देईल, असंही कंबोज यांनी स्पष्ट केलं.

मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांच्या घराची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे (bmc) अधिकारी पोहोचले आहेत. अनधिकृत बांधकामप्रकरणी (illegal construction) महापालिकेचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले असून गेल्या तासाभरापासून कंबोज यांच्या घराची झाडाझडती सुरू केली आहे. तर महापालिका अधिकाऱ्यांनी नोटीस दिली होती. त्यानुसार ते तपासणी करायला आले आहेत. मी त्यांना सहकार्य करणार आहे. त्यांनी घराची इंच इंच जमीन तपासावी. एक एक स्क्वेअर फुटाची जमीन खुशाल चेक करावी आम्हाला काही फरक पडणार नाही, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. महापालिकेचे अधिकारी पाहणी करतील. त्यानंतर त्यांचा अहवाल करतील. हा अहवाल झाल्यानंतर मला नोटीस पाठवतील. त्यावर मी त्यांना उत्तर देईल, असंही कंबोज यांनी स्पष्ट केलं.