Nagpur | नागपुरात कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लग्नसमारंभांवर कडक कारवाई

Nagpur | नागपुरात कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लग्नसमारंभांवर कडक कारवाई

| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 10:43 AM

कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने आजपासून प्रतिबंधात्मक नियमात बदल केले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागपुरातील चार लग्न समारंभावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाई करीत 50 हजारांचा दंड वसूल केला.

कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने आजपासून प्रतिबंधात्मक नियमात बदल केले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागपुरातील चार लग्न समारंभावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाई करीत 50 हजारांचा दंड वसूल केला. दोन कारवाया धंतोली झोनमध्ये तर हनुमान नगर आणि नेहरुनगर झोनमध्ये प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली. पहिली कारवाई धंतोली झोनंतर्गत असलेल्या सुयोग नगर येथील रंजना सेलिब्रेशन हॉलवर करण्यात आली. येथे लग्नसमारंभात 100 पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झाले होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यात आलेले नव्हते.  (Nagpur corona restrictions break action took on marriages)