Namdev Shastri : भगवान गडाचा नारळी सप्ताहात पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, महंत नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले…

Namdev Shastri : भगवान गडाचा नारळी सप्ताहात पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, महंत नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले…

| Updated on: Apr 17, 2025 | 12:55 PM

बीडच्या भगवानगडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगतेचा कार्यक्रम शिरूर कासार येथे होत आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत असताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बीडच्या मास्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यात मोठा राजरीय संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच आज माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस दोघेजण एका कार्यक्रमाचे निमित्त एकत्र येत आहेत. आज संत भगवान बाबा गडाचा नारळी सप्ताहाची सांगता शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावी होत आहे. यावेळी महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याचे किर्तन होणार आहे. महंत नामदेव शास्त्री हे मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांना कोणता सल्ला देतात? सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी नामदेव शास्त्री या दोघांचेही कान टोचण्याची शक्यता आहे. आमदार सुरेश धस  आणि धनंजय मुंडे हे दोघेही एकाच मंचावर येणार असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या कार्यक्रमानंतर आमदार सुरेश धस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मनोमिलन होईल का? याची चर्चा सध्या सुरू असताना यासंदर्भात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांना सवाल केला असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. राजकीय प्रश्न न विचारलेला बरा, असं एका वाक्यात उत्तर देत त्यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या एकत्र येण्यावर अधिक भाष्य करणं टाळल्याचे दिसले.

Published on: Apr 17, 2025 12:54 PM