VIDEO : Raj Thackeray Live | नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव : राज ठाकरे
नवी मुंबई विमानतळाच्या विषयावर प्रशांत ठाकूर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.नवी मुंबई विमातळ नामांतर वादावर ही भेट झाली आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या विषयावर प्रशांत ठाकूर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. नवी मुंबई विमानतळ नामांतर वादावर ही भेट झाली आहे. त्यासर्व प्रकरणावर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव असेल, नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटलांचं नाव देण्याची मागणी सुरू आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले की, संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती मी मांडली आहे. मुंबई आंतरराष्टीय विमानतळाचाच नवी मुंबई विमानतळ एक भाग आहे. त्यामुळे त्याही विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांचेच राहणार, नवी मुंबई विमानतळ हा वाढीव प्रकल्प आहे.
Published on: Jun 21, 2021 02:06 PM
