Nagpur | मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल, नाना पटोलेंची टीका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू असो वा मुस्लिम सर्वांचा डीएनए एकच असल्याचं विधान केलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत हे तपासावे लागेल, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल, संविधानात समभावाची भावना विशद करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसने मांडली आहे. रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्याचं स्वागत केलं असतं, असा टोलाही पटोले यांनी लगावला.