काँग्रेस खासदार वसंत चव्हाणांचं वयाच्या 64 व्या वर्षी निधन; नांदेड जिल्ह्यावर शोककळा

काँग्रेस खासदार वसंत चव्हाणांचं वयाच्या 64 व्या वर्षी निधन; नांदेड जिल्ह्यावर शोककळा

| Updated on: Aug 26, 2024 | 1:04 PM

'आम्ही एकत्र काम केलेलं आहे. नांदेड जिल्ह्यासाठी आम्ही एकत्र काम केलं आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी कायम लढा दिला. त्यांच्या अकाली जाण्याने नांदेड जिल्ह्याचं नुकसान झालं आहे,' असे म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजप नेते अशोक चव्हाण यांनी वसंत चव्हाण यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

नांदेडचे ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे वसंत चव्हाण हे खासदार होते. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून वसंत चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं, त्यांचा बीपी कमी झाला अन् श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नांदेडच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नसल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबाद येथे उपचारासाठी हलवण्यात आलं. दरम्यान, हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये वसंत चव्हाण यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर १३ ऑगस्टपासून उपचार सुरु होते आणि उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Published on: Aug 26, 2024 01:04 PM