Nanded News : धारदार शस्त्रानं वार अन्… जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
नांदेडच्या भोकर तालुक्यातील धावरी बु येथील एका जन्मदात्या आईच्या हातातून मुलाचा खून झाला आहे. बालाची राऊत असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आई-पत्नीला सातत्याने बालाजी राऊत मारहाण करायचा. त्यामुळे संतापाच्या भरात आईने धारदार शस्त्राने मुलाच्या डोक्यात वार केलेत.
दारू पिऊन भांडण करणाऱ्या मुलाची आईकडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील धावरी या गावात ही घटना घडली आहे. बालाजी राऊत असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. दारूच्या नशेत असताना बालाजी राऊत या व्यक्तीकडून अनेकदा आई आणि पत्नीला जबर मारहाण करण्यात आली होती. दरम्यान, संतापाच्या भरात आईनेच आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारू पिऊन भांडण करणाऱ्या मुलाला वैतागून आईने आपल्याच मुलाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली आहे. तर हत्या करण्यात आलेल्या बालाजी राऊत यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादवरून भोकर पोलीस ठाण्यात आई नागाबाई राऊत हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी राऊत अनेक दिवसापासून दारू पिऊन कुटुंबाला त्रास देत होता या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी ही माहेरी निघून गेली होती. दारू पिऊन बालाजी राऊत आपल्या पत्नीला आणि आईलाच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होता. इतकंच नाहीतर आईला मारहाणदेखील करत होता. या त्रासाला कंटाळून आईने आपल्या मुलाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
