Narayan Rane : मुख्यमंत्री हा बाप नाही तर… फडणवीसांनी समज दिल्यानंतर बापानं टोचले मुलाचे कान, राणे काय म्हणाले?
भाजप मंत्री नितेश राणे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना समज दिल्यानंतर नारायण राणेंनी देखील आपल्या मुलाचे कान टोचले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ नारायण राणे यांनी देखील आपल्याच मुलाचे कान टोचले आहे. ‘मुख्यमंत्री हा कोणाचा बाप नसतो. नितेश राणे याने केलेलं वक्तव्य हे चुकीचं आहे.’, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलंय. तर कोणाचीही बाप काढणं चुकीचं आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली आहे. अशा प्रकारे बोलणं योग्य नसल्याचे मी त्यांना सांगितले आहे आणि त्यांनी ते मान्य केलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले यानंतर नारायण राणे यांच्याकडूनही नितेश राणे यांना समज देण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत. कोणीही कितीही ताकद दाखवली. तरी शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केल्याचे पाहायला मिळाले होते.
Published on: Jun 11, 2025 01:14 PM
