Nashik Flood : नाशिकमध्ये पावसाचं थैमान… गोदाघाट अन् मंदिरं पाण्याखाली, बघा अंगावर काटा आणणारी पूरस्थिती
नाशिक शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. गोदाघाट पूर्णतः पाण्याखाली गेला असून मंदिरे जलमय झाली आहेत. अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे, तर वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून तिघांचा बळी गेला आहे.
नाशिक शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे गोदाघाट पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, मंदिरे जलमय झाली आहेत. अनेक भागांत पाणी साचल्याने शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सटाणा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळून निर्मलाबाई सोनवणे, देवचंद सोनवणे आणि कस्तुराबाई अहिरे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगापूर, दारणा, मुकणे आणि नांदूरमधमेश्वर या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे येवला, निफाड, इगतपुरीसह अनेक तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.
निफाड तालुक्यातील गोळेगाव परिसरात कर्मवीर बंधारा फुटल्याने भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रामतीर्थ गोदावरी समितीचा आरतीसाठीचा कंटेनरही वाहून गेला आहे. पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली असून, केंद्रीय मदतीचे आश्वासन दिले आहे.
