Godavari River : 3 हजार 944 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग; गोदावरीत पुरस्थिती
Nashik Floods : नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणातून आता 3 हजार 944 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीपत्रात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर धरणातून 3 हजार 944 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं आहे. परिणामी नाशिकच्या गोदावरी नदीत पुरस्थिती निर्माण झाली आहे. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं सध्या पाण्याखाली गेलेली आहेत. तर दुतोंड्या मारोतीच्या गुडघ्यापर्यंत सध्या पाणी आलेलं आहे.
Published on: Jun 23, 2025 01:24 PM
