Nashik Flood : नाशिकमध्ये पुर स्थिती; दुतोंड्या मारोतीच्या कंबरेला पाणी लागलं
Nashik Flood Situation : गंगापूर धरणातून गोदावरी नदी पत्रात 6 हजार 160 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे.
गंगापूर धरणातून गोदावरी नदी पत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. गंगापूर धरणातून 6 हजार 160 क्युसेक वेगाने हा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे गोदा पत्रातल्या दुतोंड्या मारोतीच्या कंबरेला आता पाणी लागलं आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आजही संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. परिणामी हे पाणी आता गोदावरी नदीच्या पत्रात सोडण्यासाठी धरणातून 6 हजार 160 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीपत्रात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे याठिकाणी पुराचं इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारोतीच्या कंबरेपर्यंत आता पाणी आलं आहे. सकाळी हेच पाणी दुतोंड्या मारोतीच्या पायाला लागलेलं होतं. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
