महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता… धो धो धो बरसणार पाऊस; पुढील 24 तास…
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून रामकुंड परिसरातील टपऱ्या आणि लहान दुकाने हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गोदावरी नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक नसल्यास नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री यांनी काल माध्यमांशी बोलताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे सांगितले होते. हवामान विभागाने नाशिकसह अनेक भागांत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सतर्क करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि नाशिकमधील अनेक भागांत रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. काही ठिकाणी पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि नदीपात्राची पातळी वाढणे अशा घटना समोर आल्या आहेत. रामकुंड परिसरातही प्रशासनाकडून सतत पाहणी सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.