Nirmala Gavit : नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेला दुसरा धक्का! निर्मला गावित शिंदेंच्या शिवसेनेत दाखल
Nirmala Gavit joins Shinde group : ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे सलग दोन बडे नेते शिंदेंच्या गळला लागले असून आज निर्मला गावित यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
नाशिकमधून शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का आज बसला आहे. नाशिकमधील मोठं प्रस्थ आणि ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे. आगामी पालिका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून ठाकरे गटाला हे मोठं भगदाडच पडलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बहिणी मोठ्या संख्येने दिसत आहेत. भाऊ कमी आहेत. आधी एक दराडे आले. सगळ्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा. दोन्ही दराडे बंधु म्हणजे राम आणि लक्ष्मण आलेले आहेत. निर्मला गावित यांचे स्वागत आहे. विरोधकांचा तुम्ही सुफडा साफ केला. लाडकी बहीण योजन कधीच बंद होणार नाही. सर्व मागण्या गोरगरिबांच्या आहेत. सरकार गोरगरिबांचे आहे. सरकार आणि तुम्ही वेगळे नाहीत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
