एकनाथ शिंदे यांच्याबाबतचं ‘ते’ एक विधान अन् संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल
शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 500 अन्वये संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...
नाशिक : शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 500 अन्वये संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्याला उत्तर देताना संजय राऊतांची जीभ घसरली. “हे लोक काय चाटत आहेत. ही अशी चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती”, असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. त्यामुळे राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Feb 20, 2023 08:15 AM
