Nahik Rain : सटाणा तालुक्यातील मोसम खोऱ्यात पावसाचा हाहाकार, बघा विदारक परिस्थिती
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मोसम खोऱ्याला वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या दुर्घटनेत घरांच्या भिंती कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मोसम खोऱ्याला वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंती कोसळल्या असून, या दुर्घटनेत तीन निष्पाप जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे परिसरातील विजेचे अनेक खांब उन्मळून पडले आहेत. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून, दळणवळणावरही परिणाम झाला आहे. शेतीतही मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या मका पिकाला मोठा फटका बसला असून, खरीप हंगामातील इतर पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
Published on: Sep 28, 2025 07:10 PM
