BIG News : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, राहुल गांधी, सोनिया गांधीविरोधात चार्जशीट

BIG News : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, राहुल गांधी, सोनिया गांधीविरोधात चार्जशीट

| Updated on: Apr 15, 2025 | 7:32 PM

' सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर काही जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणे हे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या सूडाचे राजकारण आणि धमकावण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि त्यांचे नेतृत्व गप्प बसणार नाही.', असं ईडीच्या या कारवाईवर भाष्य केले आहे.

नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रात काँग्रेसचे सॅम पित्रोदा, सुमन दुबे तसेच इतरांचे नावे समोर आले आहेत. ईडीने राऊज ॲव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील आरोपांची दखल घेण्यासाठी आता पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीच्या या कारवाईवर काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत हे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे सूडाचे राजकारण असल्याचे म्हटले आहे. याविरोधात काँग्रेस गप्प बसणार नाही, असाही हल्लाबोल त्यांच्याकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी एका पोस्ट करत असे म्हटले की, नॅशनल हेरॉल्डच्या मालमत्तेवर जप्ती हा कायद्याच्या नियमाचा छडा लावणारा राज्य प्रायोजित गुन्हा आहे.

Published on: Apr 15, 2025 07:32 PM