Kharghar परिसरात डोंगरात वणवा भडकला, अग्निशमन दल घटनास्थळी, कारण अस्पष्ट

| Updated on: Mar 17, 2022 | 9:33 AM

बुधवारी रात्री नवी मुंबईच्या खारघर (Kharghar Fire) भागात भीषण आग भडकली. खारघरच्या डोंगराळ भागात वणवा पेटला होता. ही आगी बघता बघता संपूर्ण डोंगरात पसरली. या डोंगराला लागूनच मानवी वस्ती असल्यानं एकच खळबळ उडाली होती.

Follow us on

नवी मुंबई : बुधवारी रात्री नवी मुंबईच्या खारघर (Kharghar Fire) भागात भीषण आग भडकली. खारघरच्या डोंगराळ भागात वणवा पेटला होता. ही आगी बघता बघता संपूर्ण डोंगरात पसरली. या डोंगराला लागूनच मानवी वस्ती असल्यानं एकच खळबळ उडाली होती. अनेक इमारती या डोंगराच्या (Massive fire in Kharghar) आजूबाजूच्या भागात आहेत. त्यामुळे ही आग चिंतेचा विषय बनली होती. दरम्यान, या आगीची घटना उघडकीस आल्यानंतर तातडीनं पोलिसांसोबत अग्निशमन दलाच्या (Fire Bridge) गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. नेमकी ही आग कशामुळे भडकली, याची माहिती मिळू शकलेली नाही. मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ आकाशात पसरले होते. आगीची दाहकता किती प्रचंड आहे, याची कल्पनाही दूरवरुनही दिसून येत होती.

चिंताजनक बाब म्हणजे आगीच्या ठिकाणाहूनच हायटेन्शन विद्युप वाहिन्याही गेलेल्या आहेत. त्यामुळे अधिकच काळजी केली जात आहे. तसंच डोंगराच्या काही भागात आदिवासी पाडेदेखील आहेत. ही आग लागली, की लावली, याबाबत अद्याप स्पष्टता येऊ शकलेली नाही. बुधवारी रात्री अकरा-साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. शेवटचं वृत्त हाती आलं, तेव्हा घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या पोहोचल्या होत्या.