लॉकडाऊन न हटवल्यास रस्त्यावर उतरणार, नवनीत राणांचा इशारा
नवनीत राणा, खासदार

लॉकडाऊन न हटवल्यास रस्त्यावर उतरणार, नवनीत राणांचा इशारा

| Updated on: Apr 08, 2021 | 5:47 PM

अमरावती जिल्हातील लॉकडाऊनला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी विरोध केला आहे.  Navneet Rana lockdown

अमरावती: कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लावले आहेत. मात्र, अमरावती जिल्हातील लॉकडाऊनला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी विरोध केला आहे.  दोन दिवसात लॉकडाऊन न हटवल्यास मी स्वतः रस्त्यावर उतरेन, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे. तर, त्यांनी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली आहे.  मुख्यमंत्र्यांंसोबत झालेल्या VC वेळी यशोमती ठाकूर यांनी अमरावतीची परिस्थिती मुख्यमंत्री यांना सांगायला पाहिजे होती. जिथे गरज नव्हती तिथं लॉकडाऊन केला हे चुकीचे असून माझा या लॉकडाऊनला विरोध असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.तर, या लॉकडाऊन मध्ये व्यापारी,कामगार यांच मरण आहे असेही त्यांनी सांगितले.