Cruise Drug Case | आर्यन खानच्या जामीन अर्जाला NCB मंगळवारी उत्तर देणार

Cruise Drug Case | आर्यन खानच्या जामीन अर्जाला NCB मंगळवारी उत्तर देणार

| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 8:16 PM

आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनसीबीला मंगळवारी न्यायालयाला उत्तर द्यायचे आहे. यावेळी उत्तराध्ये एनसीबी आर्यन खान आणि अनन्या या दोघांमध्ये झालेली व्हॉट्सअॅप चॅटिंग सादर करणार आहे. तसेच अनन्याने चौकशीमध्ये दिलेली माहिती तिचा जबाब म्हणून कोर्टात सादर केला जाणार आहे.

मुंबई : क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टीमध्ये कोठडीत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामिनाला एनसीबी विरोध करणार आहे. जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी आर्यन खान तसेच अभिनेत्री अनन्या पांडे यांच्यात झालेली व्हॉट्सअॅप चॅट आणि अनन्याचा जबाब न्यायालयात सादर केला जाणार आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनसीबीला मंगळवारी न्यायालयाला उत्तर द्यायचे आहे. यावेळी उत्तराध्ये एनसीबी आर्यन खान आणि अनन्या या दोघांमध्ये झालेली व्हॉट्सअॅप चॅटिंग सादर करणार आहे. तसेच अनन्याने चौकशीमध्ये दिलेली माहिती तिचा जबाब म्हणून कोर्टात सादर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेला सोमवारीदेखील चौकशीसाठी बोलावलं आहे. यावेळी तिचा जो जबाब नोंदवला जाणार आहे, तो देखील हायकोर्टात सादर केला जाईल. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून एनसीबी आर्यन खानच्या जामिनाला विरोध करणार आहे.