Ajit Pawar Video : होय… जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?

Ajit Pawar Video : होय… जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?

| Updated on: Mar 22, 2025 | 2:11 PM

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीआधी झालेली अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बंद दाराआडची भेट चर्चेचा विषय ठरली.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या आजच्या बैठकी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात एक बैठक झाली. यानंतर चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. यावरच अजित पवार यांनी भाष्य करत चर्चांना पूर्णविराम दिलाय. अजित पवार म्हणाले, नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील एआयच्या वापराबाबत भाष्य करत ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याची माहिती अजित पवारांनी देत एआयसंदर्भात भाष्य केले. एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता संबंधीच्या एका कमिटीत जयंत पाटील यांच्यासह इतरांचाही समावेश आहे. त्यांनी याबाबतच्या बैठकाही घेतल्या आहेत. एआयचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे. या पार्श्वभूमीवर एआयच्या संदर्भात जयंत पाटील यांचे काय म्हणणं आहे? काय सूचना आहेत? ते जाणून घेण्याचा प्रयत्न आज केला, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, जयंत पाटील आणि माझ्या या भेटीनंतर बाहेर वेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरल्या. मला त्यासंदर्भातील फोन आले. खरी वस्तुस्थिती काय आहे असा सवाल केला. पण मी सांगितले की त्यात कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्टपणे प्रतिक्रिया देत अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांच्या भेटीसोबतच्या चर्चांवर खुलासा केला आहे.

Published on: Mar 22, 2025 02:11 PM