Karuna Sharma : धनंजय मुंडेंना दिलासा, करूणा शर्मांना पोटगी देण्याच्या निर्णयासंदर्भात मोठी माहिती, कोर्टाच्या सुनावणी काय झालं?

Karuna Sharma : धनंजय मुंडेंना दिलासा, करूणा शर्मांना पोटगी देण्याच्या निर्णयासंदर्भात मोठी माहिती, कोर्टाच्या सुनावणी काय झालं?

| Updated on: Jun 20, 2025 | 10:45 AM

करुणा यांच्याशी आपला विवाह झालेला नाही. त्यामुळे याप्रकरणी डीव्ही कायदा लागू होत नाही. त्यामुळे दंडाधिकाऱ्यांचा आदेश मनमानी असून त्यात तर्काचा अभाव आहे, असा दावाही धनंजय मुंडे यांनी आपल्या याचिकेत केला होता. या याचिकेसंदर्भात काल सुनावणी पार पडली

राष्ट्रवादी काँग्रसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा शर्मा यांना पोटगी देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. तर मुंबईतील उच्च न्यायालयात धनंजय मुंडे यांच्या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांच्यासोबत लग्न झाल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने नाकारलं आहे.

मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करत करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाखांची पोटगी देण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिला होता. त्यास मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठाने धनंजय मुंडे यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.

Published on: Jun 20, 2025 10:36 AM