Jitendra Awhad Video : ‘तुला आया-बहिणी आहेत की नाही…’, आव्हाडांचा संताप, एकेरी उल्लेख करत योगेश कदमांवर निशाणा

Jitendra Awhad Video : ‘तुला आया-बहिणी आहेत की नाही…’, आव्हाडांचा संताप, एकेरी उल्लेख करत योगेश कदमांवर निशाणा

| Updated on: Feb 28, 2025 | 3:25 PM

योगेश कदम यांना अशी वक्तव्य करताना लाज वाटते की नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी योगेश कदम यांना केला. तर असं बोलू नये हे रामदास कदमांनी योगेश कदमांना सांगावं, असा खोचक सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला

पुण्यात बलात्कार झालेल्या तरुणीवरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक खळबळजनक वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. यावरून शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहे. योगेश कदम यांना अशी वक्तव्य करताना लाज वाटते की नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी योगेश कदम यांना केला. तर असं बोलू नये हे रामदास कदमांनी योगेश कदमांना सांगावं, असा खोचक सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला. ‘पुणे बलात्कार प्रकरणातील तरुणी ओरडली का नाही?’ असा सवाल योगेश कदम यांनी केला होता. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला. या वक्तव्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, आपला मंत्री म्हणतो ती ओरडली नाही. या मंत्र्याला लाजलज्जा शरम आहे की नाही? तो लहान आहे. त्याच्या वडिलांना सांगायचं आहे की असं बोलू देऊ नका, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी योगेश कदमांवर केला. आव्हाड योगेश कदमांचा पुढे एकेरी उल्लेख करत असेही म्हणाले, तू मंत्री आहे… साधा सूधा नाही, तू राज्यमंत्रिमंडळाचा प्रतिनिधी आहे. तो बाहेर येऊन असं बोलतो… असं म्हणत सडकून टीकास्त्र डागलं.

Published on: Feb 28, 2025 03:25 PM